Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रखून करुन मृतदेह पोत्यात बांधून घराशेजारीच टाकला

खून करुन मृतदेह पोत्यात बांधून घराशेजारीच टाकला

वर्ध्यातील नवीन (आष्टी) येथे राहात असलेल्या व्यक्तीची हत्या केलेला मृतदेह मृतकाच्या घरापासून शंभर फुट अंतरावर नालाच्याकडेला पोत्यात बांधलेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. काल ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीसह एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

जगदीश भानुदास देशमुख (वर्ष ३५) असे मृतकाचे नाव आहे. पोत्यात बांधून त्यांच्या घराच्या शंभर फुट अंतरावर नालाच्या कडेला सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रथमदर्शनी घातपात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -