Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्‍हापूर : वारे वसाहतीत दोन गटात जोरदार राडा

कोल्‍हापूर : वारे वसाहतीत दोन गटात जोरदार राडा

शहरातील वारे वसाहत येथे आज (शनिवार) सायंकाळी दोन गटात जोरदार राडा झाला. यामध्ये एका महिलेसह चौघेजण जखमी झाले असून, पृथ्वी आवळे (वय 24) राहणार वारे वसाहत कोल्हापूर या तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. डोक्याला, छातीला आणि पाठीला गंभीर इजा झाल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हाणामारीत तलवार, चाकू, कोयता आणि एडका यासारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. जखमी पृथ्वी आवळेसह दादासाहेब माने, सुजल कांबळे आणि रुपाली आवळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडील जखमींच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -