Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानJio Network Down, त्रांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प

Jio Network Down, त्रांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मुंबई : गेल्या तासाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क (Jio Network Down) बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचं काम करत असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जियोचं नेटवर्क ठप्प असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा

फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज !

बंद झाली आहे. याचा जियोच्या (Jio) ग्राहकांना फटका बसत आहे. कंपनीला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामध्ये जियोचं नेटवर्क गायब झाल्याचे बोलले जात आहे.

कंपनीचे कर्मचारी यावर काम करत आहेत. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हा प्रॉब्लेम लवकरच दुरुस्त केला जाईल आणि सर्वांच्या मोबाईलवर नेटवर्क असेल, अशी प्राथमिक माहिती कंपनीने दिली आहे.

दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ट्विटरसह सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या पोस्ट पडू लागल्या. तसेच ग्राहकानी कस्टमर केअरवर कॉल करुन तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जियोचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच Reliance jio कडूनही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एक तास उलटला असला तरीही जियोची सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -