ताजी बातमी ऑनलाईन टीम
वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क उभारा, अशी सूचना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वस्त्रोेद्योगमंत्री अस्लम शेख यांना केली. ही अत्यंत चांगली सूचना आहे. त्याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाऊन कोल्हापूरला मेगा टेक्स्टाईल पार्क उभारला जाईल, अशी ग्वाही शेख यांनी दिली.
शनिवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यावर आलेले वस्त्रोद्योगमंत्री शेख यांनी मत्स्य व्यवसाय, मुंबई विकास आदी विषयांवर डॉ. जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
कोल्हापूरच्या इचलकरंजीची ‘देशाचे मँचेस्टर’ अशी ओळख आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याची गरज आहे. कोल्हापुरात आपण असा पार्क सुरू करा.
यामुळे कोल्हापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. सध्या ‘केमिकल एमआयडीसी’ आहेत, त्याच धर्तीवर ‘टेक्स्टाईल एमआयडीसी’ का काढत नाही? अशी एमआयडीसी सुरू केली तर वस्त्रोेद्योगासाठी हे दिशादर्शक काम होईल, असेही डॉ. जाधव यांनी सुचविले.
कोल्हापुरात मेगा टेक्स्टाईल पार्क ही अत्यंत योग्य सूचना असल्याचे सांगत मंत्री शेख म्हणाले की, आपण रविवारी इचलकरंजीला जाणार आहे. वस्त्रोद्योगाबाबत तेथील उद्योेजकांच्या असलेल्या सूचना ऐकून घेणार आहोत. यासाठीच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे.
आपण केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून त्यांनी यापुढेही सूचना आणि मार्गदर्शन करत राहा, असे आवर्जून स्पष्ट केले.
इचलकरंजीची ‘देशात मँचेस्टर’ अशी ओळख
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -