Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाविश्वचषक विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींची मोठी...

विश्वचषक विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींची मोठी घोषणा!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अंडर- 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये (U19 WC Semifinal) भारतीय संघाने (Team India) इंग्लंडचा पराभव करत दमदार कामिगिरी केली आहे. इंग्लंडचा (Team Australia) 4 विकेट्सने दारुन पराभव करत भारतीय संघाने (U19 WC Final) विश्वचषक जिंकला. पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर भारतीय संघाने आपलं नाव कोरलं आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे जगभरातून कौतुक होत आहे. आता भारतीय संघाच्या या यशानंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. बीसीसीआयचे (BCCI)अध्यक्ष सौरव गांगुलींनी ही मोठी घोषणा केली आहे.

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लडचा चार विकेट्सनी पराभव करत विश्वचषक आपल्या नावावर केले. या विजयाचा शिल्पकार राज बावा (Raj Bava) ठरला आहे. त्याने या सामान्यामध्ये पाच विकेट्स आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. तर शेख राशिद आणि निशांत सिंधू (Nishant Sindhu) यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांना बक्षीस सुद्धा जाहीर केले आहे. या सर्व खेळाडूंना प्रत्येकी 40 लाख रुपये मिळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Saurav Ganguly) आणि सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी ट्वीट करत ही माहिती घोषणा केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -