Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड विश्वाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 28 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Bridge Candy Hospital Mumbai) उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती पण अचानक शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आयसीयूमध्ये (ICU) डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारा दरम्यान त्यांचे रविवारी सकाळी निधन झाले. लतादीदी यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लतादीदींच्या निधनानंतर सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत तसंच त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

लतादीदीच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लतादीदी यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातले एक महत्वाचे पर्व लतादीदींच्या निधनामुळे संपले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -