Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरजयसिंगपूरात दुकानाला भीषण आग; २१ जण अडकल्याने उडाली धावपळ

जयसिंगपूरात दुकानाला भीषण आग; २१ जण अडकल्याने उडाली धावपळ

जयसिंगपूर येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव बँकेलगत असलेल्या समृध्दी इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या दुकानावर असलेल्या फिनिक्स इन्फोटेकमध्ये तब्बल २१ मुले व मुली अडकल्याने एकच धावपळ उडाली. मोठ्याप्रमाणात धुराच्या लोट निघत असल्याने मुलांना श्वसन करण्यास अडथळा निर्माण झाल्याने भियभित अवस्थेत मुलांनी आरडाओरडा केली. अखेर पालिकेच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर या २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनानेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगली-कोल्हापूर महामार्गावर पोलिस स्टेशनच्या समोर समृध्दी इलेक्ट्रीकचे दुकान आहे. दुकान मालक हे सोमवारी दुपारी १ च्या सुमारास दुकान बंद करून जेवण्यासाठी घरी गेले होते. अशातच शॉर्ट सर्किटने दुकानाला आग लागली. दुकानात इलेक्ट्रीक व प्लॉस्टिक साहित्य असल्याने आगीबरोबरच मोठ्याप्रमाणात धुराचे लोट बाहेर निघत होते. या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर फिनिक्स इन्फोटेक्सचे क्लासेस आहेत. यात २१ मुले व मुली उपस्थित होते. आग लागल्यानंतर धुर पहिल्या मजल्यावर गेला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना धुराच्या कोंडमाड्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे भयभित झालेल्या मुलांनी खिडकीजवळ आम्हांला वाचवा अशी आरोळी दिली. नागरीकांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमनदल व पोलिसांना पाचारण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -