Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रधारदार हत्याराने वार करुन तरुणाची हत्या

धारदार हत्याराने वार करुन तरुणाची हत्या

धारदार हत्याराने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर घडली. अनिल आहिरे (वय-32, रा. धाबली पिंपळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपास सुरू केला आहे. चोरीच्या जनावरांच्या वादातून ही हत्त्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज असून घटनास्थळावरून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. त्यामुळे लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल. असे पोलीस उपधीक्षक समीरसिंग साळवे यांनी सांगितले.

या बाबत अधिक वृत्त असे की, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पाळवी, अशोक पवार, नरेश सौंदाणे, उत्तम गोसावी, मुद्दसर शेख, गणेश नरवटे, संदीप झालटे, खैरनार, रणजित चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर, पोटावर व हातावर धारदार हत्त्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. जवळच त्याची मोटारसायकल देखील पडलेली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -