Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपोटचा मुलगा निघाला वैरी! फक्त 900 रुपयांसाठी जन्मदात्या बापाची हत्या

पोटचा मुलगा निघाला वैरी! फक्त 900 रुपयांसाठी जन्मदात्या बापाची हत्या

राज्यात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. अशातच वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यात मुलाने फक्त 900 रुपयांसाठी वृद्ध वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. रवींद्र माळी (वय-35 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पैशासाठी वडिलांना बेदम मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जिल्हा ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहर भागातील रंजनपाडा येथे ही घटना घडली. आरोपीने त्याच्या 70 वर्षीय वडिलांची फक्त 900 रुपयांसाठी हत्या केली. जानू माळी असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 900 रुपये काढले होते. एका सरकारी योजनेतून ते त्यांना महिन्याकाठी मिळत होते. आरोपीचा वडिलांच्या पैशावर डोळा होता. आरोपीने वडिलांना 900 रुपये मागितले. परंतु ते देण्यास त्यांनी नकार दिला. त्यावरून आरोपी मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत जानू माळी यांना मोखाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावली.

पुढील उपचारासाठी त्यांनी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलगा रवींद्र माळी याला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -