लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण देशाला काल शोकसागरात बुडाला. त्यांच्या परिवाराला लतादींदींचे जाण्याने धक्का बसला, पण असाही व्यक्ती आहे जो लतादीदींचे निधन झाल्यानंतर स्वतःला सावरू शकलेला नाही. हा व्यक्ती गेली अनेक वर्षे लता मंगेशकर यांच्या सेवेत असायचा.
महेश राठोड यांना लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अश्रू अनावर झाले. ते यातून अजूनही सावरू शकलेले नाहीत. महेश राठोड म्हणाले आहे की मी आज भरपूर काही गमावलं आहे, मला आता आयुष्यात एकटे पडल्यासारखं वाटत आहे. महेश राठोड गुजरातच्या अमरेली येथील आहेत. लता मंगेशकर महेश राठोड यांना आपला भाऊ मानायाच्या.
२००१ सालापासून लतादीदी महेश यांना राखी बांधायच्या. लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने आपला बहिण कधी परत येणार नसल्याची भावना आहे. त्यांना राखी बांधायला आता बहिण नसेल आणि आता आपल्या बहिणीला पहायलाही मिळणार नसल्याने महेश राठोड दुःखी आहेत.








