भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा प्रेक्षकवर्ग फक्त दोन देशातच नव्हे, तर जगभरात आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची मोठी उत्सुक्ता असते. सामना सुरु होण्याच्या कित्येक दिवस आधीपासून चर्चा सुरु होते. हा सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी युधापेक्षा कमी नसतो. कारण पराभव कुठल्याच बाजूला मान्य नसतो. फक्त विजयच हवा ही भावना असते. या सामन्याची प्रेक्षकांना किती उत्सुक्ता आहे, त्याची कल्पना तिकीट विक्रीवरुनच आली. आज ICC ने टी-20 (T20 World Cup) वर्ल्डकपची तिकीट विक्री सुरु केली. तिकिट विक्री सुरु होताच, अवघ्या तासाभरात भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिट विकली गेली. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याला अजून आठ महिन्यांचा कालवधी बाकी आहे. 23 ऑक्टोबर 2022 रोजी मेलबर्नच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या MCG च्या स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याची सर्व तिकिट सोल्ड आऊट झाली आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -