भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमध्ये कर्णधारपद सोडलं आहे. टी-20 ची कॅप्टनशिप त्याने स्वत:हून सोडली, तर वनडेच्या कर्णधारपदावरुन विराटला हटवण्यात आलं. कारण BCCI ला मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार मान्य नव्हते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव झाल्यानंतर विराटने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनाना दिला. विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी कर्णधारपद सोडल्याची शक्यता आहे. असं असताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी विराटने पुन्हा एकदा IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद स्वीकारावे, असं मत व्यक्त केलं आहे. विराटने इंडियन प्रिमियर लीगमध्ये कर्णधारपद पुन्हा स्वीकारल्यास RCB साठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, असं अजित आगरकर यांना वाटतं.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -