Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसशेअर बाजारात मोठी पडझड, सेंन्सेक्स 1024 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांत चलबिचल

शेअर बाजारात मोठी पडझड, सेंन्सेक्स 1024 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांत चलबिचल

आंतरराष्ट्रीय अर्थजगातील घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. सेंन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली. सेंन्सेक्स 1024 अंकांच्या घसरणीसह 57,621 वर बंद झाला. तर निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 17214 वर पोहोचला. आज (सोमवारी) निफ्टीवर ऑटो, बँक, फायनान्स, रियल डी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.ऑटो इंडेक्समध्ये 1.5 टक्के, बँक आणि फायनान्शियल निर्देशांकात 2 टक्के आणि 2.5 टक्के घसरण नोंदविली गेली. एफएमसीजी निर्दशांकात 2 टक्क्यांहून अधिक आणि आयटी व फार्मा निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपन्यांचा मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घसरला.

अर्थसंकल्पातील घोषणांचा किंवा तरतुदींचा प्रभाव उद्योगजगतावर अल्पकाळ टिकला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच बाजारात पडझड नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीची बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी चलनविषयक धोरण घोषित केले जाणार आहे. अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण स्थिर राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिव्हर्स रेपो दरात घट आणि रेपो दर स्थिर अशी शक्यता अर्थवर्तृळाने वर्तविली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत चलबिचल निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -