Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीआनंदाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा 400 जण कोरना मुक्त

आनंदाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा 400 जण कोरना मुक्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोमवारी जिल्ह्यात ११३० जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये १४४ नवे कोरोना बाधित आढळून आले तर ४०० जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या आत आली असून ती १९४३ इतकी आहे. मात्र, सोमवारी दिवसभरात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या १४४ बाधितांमध्ये गडहिंग्जल-५, भुदरगड -३, गडहिंग्लज-३६, गगनबावडा-१, हातकणंगले-६, कागल-५, करवीर-१६, पन्हाळा-१०,
राधानगरी-२, शाहुवाडी-२ आणि शिरोळ तालुका-११ तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात३५, जयसिंगपूर नगरपरिषद-१, गडहिंग्लज नगरपरिषद-४ आणि अन्य
जिल्ह्यातील २ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण २ लाख १९ हजार ५२९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ११ हजार ७०८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण १९४३ इतके असून दवाखान्यामध्ये उपचारार्थ

इचलकरंजीत केवळ दोन रूग्णांची भर

गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरात कोरोना रूग्ण संख्येत घट दिसत आहे. त्यामुळे सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्या दोन रूग्णांचीच भर पडली. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला. सोमवारी सायंकाळी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील शास्त्री सोसायटी व पंचवटी टॉकीज परिसर भागात प्रत्येकी १ रूग्ण आढळून आले. सध्या केवळ ३३ अॅक्टीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १६७ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -