ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार ता.६ रोजी निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे संपुर्ण शासकीय, निमशासकीय तसेच मंत्र्यांचे कार्यक्रम रद्द केलेले असताना राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हजेरी लावून हॉटेलचे मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून उद्घाटन केले. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा करून संताप व्यक्त केला जात होता.
शहरात जुनी नगरपालिका इमारत परिसरात नव्याने हॉटेल सोमवार ता.७ रोजी सुरू करण्यात आले आहे. सदर हॉटेलच्या उद्घाटनाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले होते. मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार ता. ६ रोजी निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. दुखवटा जाहीर केल्यामुळे मंत्री महोदयांना कोणत्याही जाहीर शासकीय, निमशासकीय व इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येत नाही. मात्र, जाहीर केलेला दुखवटा पायदळी तुडवून चक्क मंत्री नाम. पाटील, स्थानिक आमदार यांच्यासह नेतेमंडळींच्या उपस्थितीत सदर हॉटेलचे मोठ्या दिमाखात उद्घाटन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. जणू कोरोना हद्दपारच झाली अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. मंत्र्यांना एक नियम व सर्वसामान्यांना एक नियम असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.
शासकीय दुखवटा डावलून मंत्र्यांनी केले इचलकरंजीत हॉटेल उद्घाटन नागरिकांतून उलट-सुलट चर्चा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -