Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने घरावर हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

कोल्हापूर : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने घरावर हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

कंदलगाव (ता. करवीर) येथे आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या आई , वडील, भाऊ, बहिणीने मुलाच्या घरावर हल्ला करत घरात घुसून आईला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. याबाबत संगीता राजू मिसाळ (वय 43) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

याप्रकरणी जुगनू केशव भाट, आरती जुगनू भाट, प्रकाश ऊर्फ शुभम जुगनू भाट व मुलगी मानसी ऊर्फ दिव्या जुगनू भाट या चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, प्रकाश भाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संगीता मिसाळ यांचे मूळ गाव वडणगे असून गेली पंचवीस वर्षे त्या आई भाऊ व मुलासह कंदलगाव येथे राहतात. सोमवारी दुपारी जुगनू भाट व त्याची पत्नी, मुलगा प्रकाश, मुलीने घरावर दगडफेक केली. घरात घुसून मला, बहीण व आई, भावजय यांना मारहाण करण्यात आली. घरातील टीव्ही, फ्रीज, भांडी तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -