Friday, March 14, 2025
Homeइचलकरंजीखासदार धैर्यशील माने, पालकमंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात कोपरखळ्या

खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात कोपरखळ्या

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या यंत्रमागधारकांच्या संवाद दौर्‍यात आमदार प्रकाश आवाडे यांनी तत्कालिन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या शिफारशींचे जोरदार समर्थन केले. या शिफारसी पुढे कायम ठेवण्याची मागणी लावून धरली.

हाच धागा पकडत खासदार धैर्यशील माने यांनी आण्णा.. ही काय ‘अ‍ॅडजेस्टमेंट’, असा चिमटा काढला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हणूनच माझं इचलकरंजीवर विशेष ‘लक्ष’ आहे असे सांगत येथील राजकारणात अधिक लक्ष देण्याचे संकेत दिले. एकंदरीत या संवाद दौर्‍यापासून भाजप अलिप्त असला तरी भाजपचे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या भोवतीच हा दौरा फिरल्याचे चित्र होते.

27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांच्या प्रश्नावर कधी नव्हे ते इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि संघटना वस्त्रोद्योग मंत्री शेख यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पहायला मिळाले. शहरात यंत्रमागधारकांची संख्या अधिक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -