Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र12 वर्षांच्या अक्षला बाबा सायकल चालवायला घेऊन गेले, ट्रकनं चिरडलं! बापासमोरच पोरानं...

12 वर्षांच्या अक्षला बाबा सायकल चालवायला घेऊन गेले, ट्रकनं चिरडलं! बापासमोरच पोरानं जीव सोडला

एका बारा वर्षांच्या मुलाचा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकनं या मुलाला चिरडलं आहे. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना या मुलाच्या वडिलांच्या देखतच घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या या दुर्दैवी मुलांच्या बापाच्या डोळ्यांदेखतच ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. 12 वर्षांचा अक्ष मालू या आठवीत शिकणाऱ्या अक्ष मालू या विद्यार्थ्यानं रविवारी सायकल चालवण्यासाठी आपल्या वडिलांसोबत घराबाहेर निघाला होती. जेव्हीएलआर वर असताना एक भरधाव ट्रकनं अक्ष याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर भरधाव ट्रकचालक फरार झाला. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी असलेल्या ट्रक चालकालाही बेड्या ठोकल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -