Saturday, July 26, 2025
Homeमनोरंजनतारक मेहतामधील 'बबीता'ला अटक, 4 तासांच्या चौकशीनंतर जामिनावर सुटका!

तारक मेहतामधील ‘बबीता’ला अटक, 4 तासांच्या चौकशीनंतर जामिनावर सुटका!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्तासंदर्भात.महत्वाची बातमी समोर आली आहे. मुनमुन दत्ताला हरियाणा पोलिसांनी अटक केली. चार तासांच्या चौकशीनंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ताने एका कार्यक्रमामध्ये एका विशिष्ट जातीविरोधात चुकीचे वक्तव्य केले होते त्याच प्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलिस ठाण्यात पोहोचली. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मुनमुन डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर झाली. तिच्याविरोधात दलीत समाजाविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी एससी-एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी तिला अटक केली. चार तास चौकशीकेल्यानंतर जामिनावर मुनमुन दत्ताची सुटका करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -