Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रसावकारीची बळी ठरलेल्या वृध्द महिलेला भीक मागण्याची वेळ

सावकारीची बळी ठरलेल्या वृध्द महिलेला भीक मागण्याची वेळ

एक वृध्द महिला फुटपाथवर भीक मागताना दिसली. तिच्याकडे नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर ती सावकारीची बळी ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयीत आरोपीने व्याजासह सर्व रक्कम वसुल करूनही तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दिलीप विजय वाघमारे (५२, रा. गंजपेठ) असे अटक करणार्‍या बेकायदेशीर सावकारी करणार्‍याचे नाव आहे.

पीडीत वृध्द महिला ही ७० वर्षाची आहे. ती पेन्शन धारक असून तीने पाच वर्षापूर्वी नातीच्या दवाखाण्याच्या उपचाराकरीता वाघमारे याच्याकडून ४० हजार रूपये दहा टक्क्याने व्याजावर घेतले होते. त्या बदल्यात महिलेनी बँकत कर्ज काढून आरोपीला ४० हजारांची मुद्दल व व्याजापोटी १ लाख दिले होते.

परंतु, वाघमारे याने महिलेच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन आणखी व्याज आहे सांगून तिचे एटीएम कार्ड आणि पासबुक काढून घेतले होते. दर महिन्याला जमा होणारी पेन्शन १६ हजार ३४४ रूपये आरोपी काएून घेत होता. महिलेला महिन्याला मोजकीच १ ते दोन हजार रक्कम देत होता. पाच वर्षापासून त्याने महिलेकडून बेकायदेशिररित्या ८ लाख रूपये वसूल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -