Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा : खोडशी येथे बिबट्याचा बछडा सापडला

सातारा : खोडशी येथे बिबट्याचा बछडा सापडला

कराड तालुक्यातील तिरपे आणि येणके या दोन गावात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याच्या घटना ताजा असतानाच तालुक्यातील खोडशी येथे बिबट्याचा सुमारे एक वर्षाचा बछडा तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्याने वनविभागाच्या हाती लागला. वनविभागाने त्या बछड्याला सुरक्षितस्थळी हलविले असून याच परिसरात आणखी एका मादी बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खोडशी गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी असलेल्या मळीत तारेचे कंपाऊड आहे. याच कंपाऊंडमध्ये एक बिबट्या अडकल्याचे मंगळवारी (दि.८) रोजी सकाळी बापूराव पाटील या शेतकऱ्याला दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील आणि वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित बिबट्याला तेथून सुरक्षितस्थळी हलविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -