ताजी बातमी ऑनलाइन टीम
मंगळवारी जिल्ह्यात केवळ ७० जण कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ३६० जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता १६४६ झाली आहे, मात्र आज दिवसभरात कोरोनाने ७ जणांचा बळी घेतला आहे.
आज दिवसभरात आढळून आलेल्या ७० बाधितांमध्ये
गगनबावडा- ३, हा त क ण ग ले – ३, कागल-१, करवीर-८, पन्हाळा-५, राधानगरी४, शाहुवाडी-४ आणि शिरोळ तालुका-४ तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-३०,
कुरुंदवाड नगरपरिषद-१, हुपरी नगरपरिषद१ आणि अन्य जिल्ह्यातील ४
जणांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख १९ हजार ५९९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १२ हजार ६८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण १६४६ इतके असून दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १३३ इतकी आहे.
इचलकरंजीत केवळ एक रूग्णाची भर तर एकाचा मृत्यू
प्रशासनाकडून मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार केवळ एका रूग्णाची भर पडली आहे. सदरचा रूग्ण छत्रपती संभाजी चौक परिसरातील आहे तर वखारभाग मध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय वृध्देचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या केवळ २८ रूग्णावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्येत कमालीची घट झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.