Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रवारंवार लग्नाच्या मागणीमुळे तरुणाची नदीत उडी घेवून आत्महत्या

वारंवार लग्नाच्या मागणीमुळे तरुणाची नदीत उडी घेवून आत्महत्या

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील 25 वर्षीय तरुणाने लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मागणीच्या त्रासाला कंटाळून पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवाशी अजय सिताराम इंगळे (वय-२५) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होते. याला अजय नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाहून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -