Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर :लता मंगेशकर यांचे जयप्रभा स्टुडिओत स्मारक साकारू

कोल्हापूर :लता मंगेशकर यांचे जयप्रभा स्टुडिओत स्मारक साकारू

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे प्रतीक असणार्‍या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक साकारू, असे टि्वट पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. कोल्हापूर आणि लता मंगेशकर यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात कोल्हापुरातूनच केली. त्यामुळे माझ्यासह समस्त कोल्हापूरकरांना याचा अभिमान आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे प्रतीक असणारा जयप्रभा स्टुडिओसुद्धा कोल्हापुरातच आहे.त्यामुळे लतादीदींचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत व्हावे, असे समस्त कोल्हापूरकरांना वाटते. मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास सर्वजण मिळून लवकरच हे स्मारक साकार करू, असे ना. पाटील यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -