Saturday, March 15, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पूरबाधित ऊस अजूनही शिवारातच!

कोल्हापूर : पूरबाधित ऊस अजूनही शिवारातच!

साखर कारखान्यांनी प्राधान्याने पूरबाधित ऊस हंगामाच्या प्रारंभी तोडून न्यावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्याचा काही साखर कारखान्यांना विसर पडला आहे. 23 साखर कारखान्यांकडे 19 हजार 378.34 हेक्टर क्षेत्रावर पूरबाधित उसाची नोंद झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यात अजूनही 4 हजार 977.92 हेक्टर क्षेत्रातील पूरबाधित ऊस शिवारातच आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नदी-ओढ्यांकाठच्या पिकांचे मोठे नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे, खते, मजुरीचे पैसेदेखील ऊस पिकातून निघत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेऊन पूरबाधित उसाला प्राधान्याने तोडणी द्यावी, अशी सक्‍त सूचना केली. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती नेमली आहे. रोजच्या रोज आढावा घेण्याची सूचनाही केली आहे; पण ही यंत्रणा गारठली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -