शस्त्रक्रियेपूर्वी तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला इतरत्र तपासणीसाठी न्यावे लागते. एक्सरे, इको, सीटी स्कॅन अशा विभागांकडे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर किंवा वॉकरची आवश्यकता भासते. दिवसभर वॉर्डमध्ये नंबर लावून स्ट्रेचर उपलब्ध होते; पण अशावेळी तुमच्या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी वॉर्डबॉय मिळेल, याची शाश्वती सीपीआर रुग्णालयात मिळत नाही. यावेळी चार मजले उतरवून रुग्णाला आणताना त्याच्यासोबत नातेवाईकांचीही फरफट दररोज नजरेस पडते.
जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून, तसेच कर्नाटक, कोकणच्या सीमाभागातील रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. अपघातग्रस्तावरील उपचार, भाजून जखमी झालेले रुग्ण, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे यशस्वी होतात. हे सर्व विभाग सीपीआरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.