Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानमोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? मोबाईल कंपन्या ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक देण्याच्या...

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? मोबाईल कंपन्या ग्राहकांना पुन्हा दर वाढीचा शॉक देण्याच्या तयारीत!

देशातील टेलिकॉम कंपन्यांची भूक भागणार नसल्याचे स्पष्ट संकेत टेलिकॉम कंपन्यांनी दिले आहेत. ग्राहकांकडून अवाच्या सवा वसुलीसाठी कंपन्यांनी येत्या दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. एका ग्राहकाकडून कमीत कमी 300 रुपये वसुलीचे उद्दिष्ट टेलिकॉम कंपन्यांनी ठेवले आहे. सध्या या योजनेवर भारती एअरटेल कंपनी काम करत आहे. सध्या या कंपन्यांची मनमानी सुरुच आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रचंड दरवाढ केल्यानंतर नफा कमविण्याच्या लालसेत या कंपन्या देशातील करोडो युजर्सना पुन्हा महागाईचा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ करणा-या कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे संकेत दिले आहे. सध्याचे दोन-चार महिने ही झळ बसणार नसली तरी याच वर्षात रिचार्ज करणे सर्वसामान्यांना अवघड होणार आहे.

आता या दरवाढीचा फायदा कंपन्याना होतो की वापरकर्ते यातून आयडीयाची कल्पना लढवितात हे लवकरच स्पष्ट होईल. 2022 साली मोबाईल कॉल आणि सेवांच्या किंमतीही वाढण्याचे संकेत देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -