Sunday, December 22, 2024
HomeसांगलीMiraj : ‘भाई’साठी गाडी न दिल्याने मारहाण

Miraj : ‘भाई’साठी गाडी न दिल्याने मारहाण

‘भाई’ला आणण्यासाठी मोटारसायकल न दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोटारसायकलवर दगड मारुन नुकसान केले. तसेच कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी दिली, याप्रकरणी श्रीधर संजय मोरे याने पाच जणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सौरभ पोतदार (रा. म्हाडा कॉलनी), ओंकार चौगुले, डावर्‍या उर्फ अक्षय चौगुले (दोघे रा. राममंदिर जवळ), ओंकार साळुंखे (रा. मिरज) आणि गोसावी (रा. मंगळवार पेठ, मिरज) यांचा समावेश आहे.
श्रीधर मोरे हा मंगळवारी शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथून मोटारसायकलवरुन जात होता. त्यावेळी सौरभ व ओंकार या दोघांनी त्याला अडविले. “आमच्या भाईला घेऊन यायचे आहे. तुझी गाडी दे”, असे म्हटले. श्रीधर याने गाडी न दिल्याने दोघांनी जबरदस्तीने त्याच्या गाडीवर बसून त्याला एका उद्यानाजवळ नेले.

त्या ठिकाणी असलेल्या अक्षय आणि ओंकार या दोघांना ते घेऊन पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटील चौकात आले. त्यानंतर ओंकार याने “भाईला आणायला गाडी का दिली नाहीस”, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सौरभ याने “भाईला आणायला गाडी देत नाहीस”, असे म्हणून मारहाण करून गाडीवर दगड मारुन नुकसान केले. यावेळी सौरभ याने “भाई सोबत पंगा घ्यायचा नाही. तू निघून जा नाहीतर कोयत्याने तोडून टाकीन”, असे म्हणून ओंकार याला कोयता घेऊन यायला सांंगितले, असे मोरे याने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -