ताजी बातमी ऑनलाईन टीम
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court )बैलगाडा शर्यतीला(Bulk cart race) परवानगी दिल्यानंतर आंबेगाव (Ambegav) तालुक्यातील लांडेवाडीत बहुप्रतीक्षित बैलगाडा शर्यत उद्या पार पडत आहे. उद्या (दि. १० फेब्रुवारी) सकाळी 7:30 वाजता शर्यतीला सुरुवात होणार आहे. तर मावळ तालुक्यातील नाणोलीमध्ये बैलगाडी शर्यत शनिवार (दि. १२ फेब्रुवारी) ला सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. या बैलगाडा शर्यतींमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 354 बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत .
मावळामध्ये भरणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . यामध्ये मावळ मधील चाकण तर्फ नाणोली मधील बैलगाडा शर्यतीत
प्रथम क्रमांक- प्रथम क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक बारीस एक मोटारसायकल
द्वितीय क्रमांक-1 लाख 51 हजार रुपये रोख आणि एक अर्धा तोळ्यांची अंगठी
तृतीय क्रमांक-1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
चतुर्थ क्रमांक-75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
घाटाचा राजा -1 एक तोळ्याची अंगठी
-शर्यत आकर्षक फायनल सम्राट प्रथम क्रमांक-51 हजार रुपये रोख द्वितीय क्रमांक-31 हजार रुपये रोख तृतीय क्रमांक-21 हजार रुपये रोख
शर्यत ऐनवेळी केली होती रद्द सर्वोच्च न्यायालयांच्या निकालनंतर लांडेवाडीत सर्वात प्रथम बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक त्या परवानग्याही काढण्यात आल्या होता. सर्व तयारी झाली होती. मात्र ऐनवेळेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. शर्यतीला या अवघे काही तास उरले असताना शर्यत रद्द केल्याने शर्यत प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चमकही झाली होती. त्यामुळे उद्या होऊ घातलेल्या शर्यतीकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या घुमणार भिर्रर्र… आवाज ; किती वाजता स्पर्धा होणार सुरु, बक्षिसाची रक्कम काय? वाचा इथे
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -