Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ; फेसबूकवरून मैत्री झाली, युवकाने फ्लॅटवर बोलावले आणि…

सामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ; फेसबूकवरून मैत्री झाली, युवकाने फ्लॅटवर बोलावले आणि…

पीडित तरुणी ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. काही दिवसांपूर्वी तिची एक मित्राशी फेसबुकवरून ओळख झाली. दोन फेब्रुवारी रोजी कॅम्पस चौकातून त्या मित्राने आपल्या दुचाकीवर युवतीला बसवले. तिला जाफरनगर ले-आऊट भागातील एका फ्लटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. बलात्कार करण्यापूर्वी तिला गुंगीचे औषध दिले होते. काही वेळाने दुसरा त्याचा एक मित्र आला. त्यानंतर चार-पाच जण तिथं आले. त्यांनी तिच्यावर बळजबरी केली. त्यामुळं युवती प्रचंड घाबरली होती. त्यानंतर तरुणीला सीताबर्डी भागात सोडून दिले. दुसर्‍या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी दारूची पार्टी केल्याची माहिती आहे. तिच्यावर दुसर्‍यांदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.

घरी गेल्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासानंतर तिच्यावर बळजबरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. पीडितेने गुरुवारी सायंकाळी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू याही ठाण्यात पोहचल्या. पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले जाफरनगर तर दोन मुले बजेरिया येथील रहिवासी आहेत. गुन्हे शाखा आणि पोलिसांचा डीबी स्वॅड आरोपींच्या शोधासाठी कामाला लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -