दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘पुष्पा’ चित्रपटाच्या यशानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. अल्लू अर्जुनसोबतची तिची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली. रश्मिका मंदाना ही भारतातली सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. तिला कर्नाटक क्रश देखील म्हटले जाते. रश्मिकाला हिंदी प्रोजेक्ट्समध्येही काम करण्याची संधी मिळाली असल्याचे कळतेय. टॉलिवूडमधील रिपोर्टनुसार रश्मिका लवकरच नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यात ती सुपरस्टार राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
राम चरणसोबत झळकणार रश्मिका
मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका मंदाना राम चरणसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. मात्र या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. राम चरणच्या चित्रपटात रश्मिकाच्या सहभागाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र वेब मीडिया प्लॅटफॉर्मच्या वृत्तानुसार निर्माते मुख्य भूमिकेसाठी रश्मिकाचा विचार करत आहेत.