सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून कुटुंबीय व माझ्या वकिलांशी चर्चा करून सरेंडर झालो. मला कोणीही अटक करू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे चार दिवसांचे संरक्षण असतानाही मी न्यायालयात हजर झालो. सरेंडर झाल्यानंतर व होण्यापूर्वीही मी पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले व यापुढेही करणार आहे. मात्र, विरोधकांकडून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी गुरुवारी जामिनावर सुटका झाल्यानंतर सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. नितेश राणे यांच्यावर कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गुरुवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जामिनाची पूर्तता करण्यासाठी आ. नितेश राणे फोंडाघाटमार्गे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दुपारी 2.30 वा. दाखल झाले.
जनतेला त्रास नको म्हणून ‘सरेंडर’ झालो : नितेश राणे
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -