Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाआयपीएल इतिहासातल्या सर्वात महागड्या खेळाडूला एका वर्षाच्या आत टाटा-बाय बाय!

आयपीएल इतिहासातल्या सर्वात महागड्या खेळाडूला एका वर्षाच्या आत टाटा-बाय बाय!

इंडियन प्रीमियम लीग 2022 हंगामाची लिलाव प्रक्रिया 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत, ज्यावर फ्रेंचायझी भरपूर पैसा खर्च करण्यास तयार असतील. कोणता खेळाडू सर्वाधिक किमतीला विकला जातो याकडे सर्वांच्या नजरा असतील. महा लिलावात सर्वात महागड्या खेळाडूचे विक्रम दरवर्षी होत नाहीत. तरीही उत्सुकता कायम असणा आहे. या उत्सुकतेमागचं कारण म्हणजे गेल्याच वर्षी आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक बोलीवर विकल्या गेलेल्या खेळाडूचा विक्रम झाला होता. ज्या खेळाडूवर ही बोली लागली त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस होता. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले होते.

दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत आयपीएलच्या 8 हंगामांमध्ये खेळला आहे. या काळात 4 वेगवेगळ्या फ्रेंचायझींसाठी तो खेळला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्ससाठी एकूण 81 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8 च्या इकोनॉमी रेटने आणि 24 च्या सरासरीने 95 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, 155 च्या स्ट्राइक रेटने 618 धावा केल्या आहेत. मॉरिस या वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, कारण त्याने गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -