Monday, January 6, 2025
Homeराजकीय घडामोडीपंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस ठाण्यात काढायला लावल्या उठाबशा

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस ठाण्यात काढायला लावल्या उठाबशा

पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला माफी मागण्यासाठी चक्क पोलीस ठाण्यातच कानधरून उठाबशा कराव्या लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस ठाण्यातील घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची चांगलीच किरकिरी होवू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर टाकलेल्या प्रकाराची माफी मागण्याकरिता सदर व्यक्तीने स्व:हूनच उठाबशा काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र सदर व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये त्याला उठाबशा काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे दिसून आहे. या प्रकाराला आता राजकीय रंग लागत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुर्झेकार हा ब्रम्हपुरी येथीलच निवासी आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच जाहीर माफी मागून सोशल मीडीयावरून पोस्ट हटविली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -