आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल गोव्यात प्रचारसभा घेतल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासह महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक निवडणुका लढवणार आहोत. तसेच शिवसेनेत वाघ असतात अन् वाघांचा बाजार नसतो, असा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यातील घरोघरी पोहोचलोय. शिवसेना मनात होतीच आता धनुष्यबानाच्या निमित्तानं घरोघरी पोहोचली आहे. गोव्यात जशा प्रकारे आम्ह निवडणूक लढवत आहोत. त्याच प्रमाणे आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवणार आहे.
आम्ही कुठेतरी सत्ता आली म्हणून आम्ही कुठेतरी जात नाही. आम्ही जे वचन देतो ते पूर्णच करतो. या ठिकाणी आम्ही उत्पल परीकर यांना न्याय देण्यासाठी त्यांना सहकार्य कण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या गोव्यातील निवडणुकीबाबत सांगायचे झाले तर आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत तर गोव्यातील स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र मॉडेल घेऊन शिवसेना रणांगणात उतरणार आहे,असेही ते म्हणाले.