Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा : फसवणुकीतील ३ कोटींची २४ वाहने जप्त; ३ राज्यात गुन्ह्याची व्याप्ती

सातारा : फसवणुकीतील ३ कोटींची २४ वाहने जप्त; ३ राज्यात गुन्ह्याची व्याप्ती

सातार्‍यातील फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या ट्रकचे हाप्ते थकल्यानंतर त्‍याची परस्‍पर विक्री करून मुळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ट्रकचे हाप्ते थकल्यानंतर ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून ट्रक घेवून मूळ ट्रक मालकांची फसवणूक केली होती. अशी फसवणूक करणार्‍या टोळीचा सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) पर्दाफाश केला.

गोवा, गुजरातसह महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यात या गुन्ह्याची व्याप्ती असून पोलिसांनी 2 कोटी 65 लाख रुपये किंमतीचे ट्रक, बोलेरोसह टमटम अशी 24 वाहने पोलिसांनी जप्त केली.

उन्मेश उल्हास शिर्के (वय 48, रा.निरा ता.पुरंदर, पुणे), अब्दुलकादीर मोहम्मद अली सय्यद (रा.सुपा ता.पारनेर, अहमदनगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -