बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सौदर्यांने चाहत्यांना भूरळ घालत असते. नेटफ्लिक्सवर ‘द फेम गेम’ वेबसीरीज तिची लवकरच येत आहे. याच शोच्या प्रमोशनमध्ये सध्या माधुरी दीक्षित बिझी आहे. या कार्यक्रमातील तिच्या खास ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या तर या शाेचा होस्ट, अभिनेता अर्जुन बिजलानी तर माधुरीला एकटक पाहातच राहिला.
अनेक वर्षानंतर माधुरी नेटफ्लिक्सवर ‘द फेम गेम’ वेबसीरीज घेवून येत असून सध्या ती या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी कार्यक्रमात माधुरी एका ब्लॅक रंगाच्या मिनी शार्ट आउटफिटमध्ये दिसली. स्टेजवर माधुरी पोहोचताच सर्वांच्या नजरा तिने घातलेल्या ड्रेसवर खिळल्या. नेहमी माधुरीला साडीत पाहिले जाते. परंतु, या कार्यक्रामात तिने मिनी शार्ट ड्रेस घातल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.