ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीगच्या (INDIAN PREMIER LEAGUE) नव्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. जगभरातील क्रिकेट खेळाडूंची लिलाव (PLAYER AUCTION) प्रक्रिया शिखरावर पोहोचली आहे. चेन्नईत 8 संघ मालक बाह्या सरसावून पसंतीच्या खेळाडूंवर बोलीसाठी कोट्यावधींची उधळण करीत आहेत. प्राथमिक फेरीत आतापर्यंत अनेक खेळाडूंवर 5 कोटी रुपयांहून अधिक बोली लावण्यात आली आहे. तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ही ठरले आहेत. खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची उड्डाणे होत असताना संघ मालकांच्या पदरात नेमकं काय पडतं? बक्षिसाची रक्कम 20 कोटी अन् खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांचा खर्च? संघ मालकांना (TEAM OWNER) मिळणाऱ्या पैशांच गणित काय? तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची ‘ए टू झेड’ उत्तरं जाणून घ्या-
बक्षिसाची रक्कम:
स्पर्धा छोटी असो वा मोठी विजेत्याच्या पारड्यात बक्षिसाची रक्कम फिक्स्ड असतेचं. आयपीएल देखील अपवाद ठरत नाही. आयपीएल हंगामात विजयी संघाला 20 कोटी आणि उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये मिळतात. मात्र, संघ मालकांकडून खेळाडूंवर बक्षिसाच्या रकमेहून अधिक खर्च होत असल्यानं उत्पन्नाचं साधन म्हणून बक्षिसाची रक्कम नगण्यच ठरते.
टायटल स्पॉन्सरशिप
आयपीएलचा डंका जगभर गाजतो. कॉर्पोरेट ब्रँड्स संधीचं सोनं तयार करण्यासाठी तय्यारचं असतात. जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या आयपीएलच्या माध्यमातून आपला ब्रँड पोहचविण्यासाठी टायटल स्पॉन्सरशिपचा मार्ग वापरला जातो. अशा कंपन्या बीसीसीआयला रग्गड रक्कम मोजतात. जसं की डीएलएफ आयपीएल, व्हिवो आयपीएल
एन्ट्री तिकिट
आयपीएलचा सामना म्हटल्यावर तिकिटासाठी वेटिंग असते. घरच्या संघाचा सामना होम ग्राऊंडवर असला तर विषयच वेगळा असतो. संघांना प्रेक्षकांना स्टेडिअममधील प्रवेश तिकिटातून काही प्रमाणात वाटा मिळतो. होम पिचवर सामना असल्यास त्या संघाला काही रक्कम दिली जातं. स्टेडिअममुळं हाऊसफुल्ल तर संघ मालकांचा गल्ला ओव्हरफुल्ल होतो.
मीडिया प्रसारण हक्क
आयपीएल संघ मालकांना उत्पन्नाच्या विविध मार्गात टॉप ठरणारा मार्ग म्हणजे मीडिया प्रसारण हक्क. आयपीएलच्या सर्वोच्च टीआरपीमुळे जगभरातील प्रसारण कंपन्या बीसीआयकडे प्रसारण हक्कासाठी बोली लावतात. आतापर्यंत सोनी एंटरटेन्मेंटने 8200 कोटी, स्टार इंडिया 16,347 कोटी रुपयांत प्रसारण हक्क खरेदी केले होते. बीसीसीआयला प्रसारण हक्कांच्या विक्रीतून कोट्यावधी रुपये मिळतात. बीसीसीआय-संघ मालक प्रसारण विक्री रक्कम वाटून घेते.
कोट्यावधी गुंतवायचे, रिटर्न्स काय? IPLचं बिझनेस मॉडेल इतक्या सोप्या भाषेत कुणीही सांगणार नाही! वाचा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -