ताजी बातमी ऑनलाईन टीम
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पार्टीचे नेते आणि खासदार आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Husain) सध्या चर्चेत आहेत. 49 वर्षीय नेते आमिर लियाकत हुसैन यांनी ट्विटवर 18 वर्षाच्या सैयदा दानिया शाह (Syeda Dania Shah) हिच्याशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. आमिर लियाकत हुसैन यांचं हे तिसरं लग्न आहे. आमिर हुसैन यांची दुसरी पत्नी सैयदा तूबा अनवर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून तलाक संदर्भात माहिती दिली होती. आमिर लियाकत हुसैन एक ट्विट करुन लग्नाबद्दल माहिती दिली होती. दक्षिण पंजाबच्या लोधरानमधील सदाआत कुटुंबातील सैयदा दानिया शाह हिच्याशी निकाह केला असून तिचं वय 18 वर्ष आहे. लियाकत हुसैन यांनी चाहत्यांनी शुभेच्छा द्याव्यात असं म्हटलंय. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद उफाळून आला असून चर्चांना सुरुवात झालीय. दुसऱ्या पत्नीला तलाक दिल्याच्या दुसऱ्या दिवशी आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केला.
सैयदा दानिया शाह आमिर लियाकत हुसैन यांची फॅन
आमिर लियाकत हुसैन यांच्याशी लग्न झाल्यानंतर सैयदा दानिया शाह हिने माध्यमांशी संवाद साधला. आमिर लियाकत हुसैन हे लहानपणापासून आदर्श असल्याचं म्हटलं आहे. लहानपणी ज्यावेळी रडत असे त्यावेळी माझे आई वडिल टीव्हीवर आमिर लियाकत हुसैन यांचा फोटो दाखवत असल्याची सैयदा हुसैन हिनं सांगितलं.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्याऱ्या मीम्सचा पाऊस सोशल मीडियावर पडला. फेब्रुवारी या ट्विट अकाऊंटवरुन आमिर हुसैन यांचा एक फोटो ट्विट कत आमिर लियाकत हुसैन यांनी 18 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीला हातात घेतल्याचं म्हटलंय.
आमिर लियाकत हुसैन आणि सैयदा दानिया शाह यांच्या वयातील अंतरावरुन टीका करणारी अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2018 मध्ये दुसरं लग्न
लियाकत हुसैन याच्या ट्विटच्या एक दिवस अगोदर दुसरी पत्नी सैयदा तूबा अनवर हिला तलाक संदर्भात माहिती दिली होती. सैयदा तूबा अनवर हिनं 2018 मध्ये आमिर लियाकत हुसैन याच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता सैयदा तूबा अनवर हिला तलाक देत आमिर लियाकत हुसैन यानं तिसरं लग्न केलंय.
पाकिस्तानी खासदाराचा 49 व्या वर्षी 18 वर्षाच्या मुलीशी तिसरा निकाह, आमिर लियाकत हुसैनच्या लग्नानं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -