ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज तालुक्यातील बेळंकी येथील शेतकरी अमोल गायकवाड या तरुण शेतकऱ्यास नाशिक येथील व्यापाऱ्यांनी 1 लाख 92 हजारांचा गंडा घातला आहे.बेळंकी येथील शेतकरी अमोल गायकवाड यांने अडीज एकर क्षेत्रात द्राक्ष बाग लावली होती.त्या द्राक्ष बागेतील 1500 पेटी माल हा येळावी येथील किरण पाटील व केतन पाटील यांच्या मध्यस्थीने नाशिक येथील व्यापाऱ्यांना 3 लाख 52 हजारांना विकला होता.
1 लाख 60 हजार रक्कम मिळाली होती.पण उर्वरित रक्कम 1 लाख 92 हजार रुपये येणे बाकी होते.सदरचा व्यवहार हा डिसेंबर 2021 ला झाला होता.ठरल्याप्रमाणे रक्कम येणे हवे होते.पण नाशिक येथील व्यापारी इसाक शेख,चांद शेख,फारुक शेठ हे येळावी येथील दलाल किरण पाटील केतन पाटील यांनी गायकवाड फोन करत असताना फोन उचलण्यास टाळाटाळ केली.तेव्हा गायकवाड यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.तेव्हा गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिरज तालुक्यातील बेळंकी येथील शेतकऱ्यांला 1 लाख 92 हजारांचा घातला गंडा:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -