ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलच्या मागील सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात असणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला यंदा मुंबई इंडियन्सने तगडी बोली लावत आपल्या संघात घेतले. आज लिलवात राजस्थानेही जोफ्रा आपल्याच संघात राहण्यासाठी बोली वाढवत नेली. अखेर अंबानींनी बाजी मारत जोफ्रासाठी ८ कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात घेतले. आता मुंबईच्या ताफ्यात जसप्रित बुमराह बरोबरच जोफ्रा सारखा तगडा वेगवान गोलंदाज असणार आहे.
वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदजा ऑबेड मेकॉय याला राजस्थान रॉयल्सने ७५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फ याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७५ लाखांची बोली लावली.
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणार्या बीन मॅकटरमोट यालाही कोणी पसंती दिली नाही. सेच न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स याच्याही पाटी कोरीच राहिली आहे.
इंग्लंडचा लायम लिविंगस्टोन ठरला महागडा विदेश खेळाडू
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) महालिलाव ( IPL Auction ) आज दुसर्या दिवशी सुरु झाला असून इंग्लंडचा लायम लिविंगस्टोन ठरला महागडा विदेश खेळाडू ठरला आहे. लायम लिविंगस्टोन यासाठी पंजाब किंग्जने तब्बल ११.५० कोटी रुपये मोजले. दुसर्या दिवशीच्या आतापर्यंतच्या लिलावात तो सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मागील सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने लयामवर २ कोटींची बोली लावली होती. आतापर्यंत १४२ खेळाडूचे लिलावामध्ये उतरले. पहिल्या दिवशी ९७ तर दुसर्या दिवशी ४५ खेळाडूंचा लिलाव झाला. १० संघांनी आतापर्यंत ९६ खेळाडूंवर बोली लावली. पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंचा संघ निश्चित झाला होता.
IPL Auction : जोफ्रा आर्चरसाठी मुंबई इंडियन्सची आठ कोटींची बोली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -