ताजी बातमी ऑनलाइन टीम
चा आज दुसरा दिवस आहे. दहा फ्रेंचायजी वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावत असताना मुंबई इंडियन्सची रणनिती अजूनही कोणाला समजलेली नाही. अन्य फ्रेंचायजींच्या तुलनेत अजूनही मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) खूप सावध बोली लावत आहे. मुंबई इंडियन्सने अजूनपर्यंत फक्त दहाच खेळाडूंना विकत घेतलं आहे. त्यांना जास्तीत जास्त 21 खेळाडूंना विकत घेता येईल. मुंबई खेळाडूंना विकत घेतना इतकी आक्रमक बोली लावत नाहीय, त्यामागे त्यांची पर्सही एक कारण असू शकते. खेळाडू रिटेन (Retain players) केल्यानंतर मुंबईच्या पर्समध्ये 48 कोटी उरले होते. काल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबईने 15.25 कोटी रुपये मोजून इशान किशनच्या रुपाने दिवसातला सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला. इशान किशन सोडल्यास लिलावात मुंबईने अजूनपर्यंत अन्य दुसरा कुठला मोठा खेळाडू संघात घेतलेला नाही. लिलावाची मुंबईची जी स्ट्रॅटजी आहे, त्यावर सोशल मीडियात टीकाही होतेय. मुंबईला संघ बांधणीच्या दृष्टीने आज खेळाडू विकत घ्यावेच लागतील. मुंबई लिलावाच्या उर्वरित सत्रात कुठले खेळाडू विकत घेणार? त्याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे.
आतापर्यंत मुंबईने लिलावात विकत घेतलेले खेळाडू
इशान किशन (15.25 कोटी)
डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी)
बासिल थम्पी (30 लाख)
मुरुगन अश्विन (1.6 कोटी)
जयदेव उनाडकट (1.30 कोटी)
मयंक मार्कंडे (65 लाख)
मोहम्मद अरशद ( 20 लाख)
रायली मेरिडिथ ( 1 कोटी)
टिम डेव्हिड (8.25 कोटी)
टायमल मिल्स (1.50 कोटी)
डॅनियल सॅम्स (2.60 कोटी)
जोफ्रा आर्चर (8 कोटी)
तिलक वर्मा (1.70 कोटी)
संजय यादव (50 लाख)
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले 4 खेळाडू
पहिला खेळाडू – रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.
दुसरा खेळाडू – जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.
तिसरा खेळाडू – सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.
चौथा खेळाडू – कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये
(मुंबईकडे 48 कोटी रुपये होते)
2022: ‘ही’ आहे मुंबईने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -