Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदिलासादायक! मोदी सरकारने कच्च्या पामतेलवर कस्टम ड्यूटी कमी केली

दिलासादायक! मोदी सरकारने कच्च्या पामतेलवर कस्टम ड्यूटी कमी केली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

| खाद्यतेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने शनिवारी क्रूड पाम तेल किंवा सीपीओवरील प्रभावी कस्टम ड्युटी 5.5 टक्के कमी केली. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

एका अधिकृत नोटीफिकेशनमध्ये शनिवारी सांगण्यात
आले की, आता 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर कच्च्या पाम तेलावर लावला जाईल, जो आतापर्यंत 7.5 टक्के होता. या कपातीनंतर क्रूड पाम तेलावरील प्रभावी कस्टम ड्युटी 8.25 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के होईल.

ऑक्टोबर 2021 मध्ये खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली होती या कपातीमुळे भाव 280 रुपये प्रति क्विंटलने खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्येही खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. भारत आपल्या खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांहून अधिक गरज आयातीद्वारे भागवतो. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला आरबीडी पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. (Crude Palm Oil)
शनिवारी बाजारातील घाऊक भाव पुढीलप्रमाणे होते – (रु. प्रति क्विंटल) मोहरी तेलबिया – 8350-8380 (42 टक्के स्थिती किंमत) रु. भुईमूग – 5,825 – 5,920 रुपये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -