Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यव्हेलेंटाईन डेपूर्वी चेहऱ्यावर येईल ग्लो, पार्लरला न जाता घरीच ट्राय करा मैद्याचे...

व्हेलेंटाईन डेपूर्वी चेहऱ्यावर येईल ग्लो, पार्लरला न जाता घरीच ट्राय करा मैद्याचे हे 3 फेसपॅक!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सध्या व्हेलेंटाईन वीकमध्ये (Valentine Week) सुरु आहे. व्हेलेंटाईन वीक हा प्रेमीयुगुलांचा आवडता दिवस आहे. 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे (Valentine Day 2022) जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांसमोर (Kiss Day Special) प्रेम व्यक्त करतात. व्हेलेंटाईन डेच्या दिवशी प्रत्येक मुलीला सुंदर दिसावे असे वाटत असते. या दिवशी सुंदर दिसणे हे प्रत्येकासाठी खूपच महत्वाचे असते. कपड्यांबरोबरच आपला चेहरा देखील सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक तरुणी व्हेलेंटाईनपूर्वी पार्लरमध्ये (Parler) जातात. पण पार्लरमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा आणि जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर घरीच तुम्ही अवघ्या काही मिनिटांत ग्लोईंग स्किन मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला मैद्याचा (Maida) वापर करावा लागेल.

आपल्या स्वयंपाक घरामध्ये मैद्यापासून अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? ग्लोइंग आणि मुलायम स्किनसाठी मैद्याचा वापर केला जाऊ शकतो. मैद्याचा वापर करुन तुम्ही खूप चांगली त्वचा मिळवू शकता. त्याचसोबत चेहऱ्यावरील मुरुम आणि पिगमेंटेशन (acne and pigmentation) या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला मैद्यापासून फेसपॅक (Maida Face Pack) कसा तयार करायचा हे सांगणार आहोत….

हा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा, एक चमचा दही आणि एक चमचा गुलाब जल घ्यावे लागेल. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करुन त्याची चांगली पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट एक तास फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. Also Read – Mint Benefits for Skin: त्वचेच्या समस्येने त्रस्त आहात, मग पुदिन्याचा असा करा वापर!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -