Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाधोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

TATA IPL 2022 Mega Auction च्या पहिल्या दिवशी काल एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायजींनी विकत घेतलं. या खेळाडूंमध्ये मुंबईकर तुषार देशपांडे (Tushar Deshpande) सुद्धा आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या तुषार देशपांडेला महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतलं. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या तुषारची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. त्याला त्याच किंमतीला CSK ने विकत घेतलं. 2016 _ 17 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये मुंबईकडून त्याने पदार्पण केलं. विजय हजारे करंडकासह दुलीप ट्रॉफीमध्येही तुषार खेळला आहे.

मूळचा मुंबईचा असलेल्या तुषारला सर्वप्रथम 2020 आयपीएलमध्ये संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने त्याला पाच सामन्यात संधी दिली. त्यात त्याने तीन विकेट घेतल्या. दिल्लीने त्याला 2021 च्या आयपीएल सीजनसाठी मात्र रिटेन केलं नाही. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या रिटेन न केल्यामुळे वाईट वाटलं होतं, असं त्याने सांगितलं. क्रिक ट्रॅकरने हे वृत्त दिलं आहे.

फ्रेंचायजीने मला सोडून द्यावं, इतका मी वाईट खेळ केला नव्हता. एखाद्या सामन्यात तुम्ही खराब कामगिरी केली, याचा अर्थ तुम्ही वाईट गोलंदाज आहात, असा होत नाही” बिहाईड द स्टंम्पस विथ अनुजमध्ये कार्यक्रमात तुषारने मनातील ही खंत बोलून दाखवली होती. तुषारने आयपीएल 2022 मध्ये पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काल त्याच्यावर चेन्नईने बोली लावली. त्यामुळे त्याला आता धोनी सारख्या महान खेळाडूसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी मिळणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तुषार देशपांडेने 20 सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -