Taji Batmi Online Tim
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करु शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारंनी आरबीआयची भरती (RBI Vacancy 2022) संदर्भातील अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वीक वाचावी असा सल्ला देण्यात आला आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणार आहे. तर 08 मार्च 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022
आरबीआय सहाय्यक (RBI Assistant) – एकूण जागा 950
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Officeचे ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया –
पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. त्यानंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.
फी –
Gen / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 450/- रुपये
SC / ST / PH / ESM मागासवर्गातील उमेदवारांसाठी – 50/- रुपये
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र –
– बायोडेटा
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो
RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 जागांसाठी मोठी भरती, असा करा अर्ज!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -