ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यात संजय राऊत कोणता बॉम्ब टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकारणात एक मर्यादा असते, पण ती मर्यादा ओलांडली गेली आहे. आम्ही खूप सहन केले, पण आता त्यांना उद्ध्वस्त करणार आहोत. महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे आणि हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वातील आहे हे लक्षात घ्या. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण कोठडीत जातील, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपला सळो की पळो करून सोडलेले संजय राऊत ईडीच्या कारवायांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रस्थानी आहेत.
त्याचबरोबर आघाडी सरकारमधील अनेकांनी ईडी सीबीआयचा ससेमीरा लागल्याने तसेच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल शिवसेना संजय राऊत यांनी महाराष्ट्र काय आहे ते मंगळवारी सगळ्यांना कळेल. शिवसेना नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलेल. आम्ही खूप सहन केले, आता डोक्यावरून पाणी चाललंय, आता बघाच आम्ही यांना उद्धवस्त केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा भाजपला दिला.
Sanjay Raut Press Conference Live : ‘सरकार पाडण्यात मदत नाही केली नाही तर केंद्रीय यंत्रणा टाईट करतील’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -