ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबईतील एका मॉलमध्ये हातात हात घालून फिरणाऱ्या एका मुलीला आणि मुलाला एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मग बुद्धीला ताण देत अगदीच रुळलेलं उत्तर दिलं. तो प्रश्न होता, हे प्रेम येतं कुठून? मग नुकताच प्रेमात पडलेल्या त्या प्रेमवीरानं सांगितलं की, प्रेम (Love) ना ह्रदयातून येत ना मेंदुतून प्रेम मिळतं ते फक्त योगायोगानं. असं त्या तरुणानं एकदम जोशात उत्तर दिलं, आणि त्या उत्तराला जोडूनच त्याच्या बरोबर असलेल्या मोहतरमाने (Lovers) तेच उत्तर सुधारत म्हणाली की, खरं प्रेम योगायोगानं होत असलं तरी त्याला नशीबाचीही साथ लागते. या त्यांच्या प्रश्नानंतर सवाल जवाब असं करणाऱ्या त्या सामाजिक संस्थेनं त्या लव्हबर्डच्या (Love Birds) उत्तराबरोबर त्यांचं संशोधन त्यांनी चालूच ठेवलं आणि अनेकांना मग पुन्हा तोच आणि एकच प्रश्न केला की, प्रेम ह्रदयातून येतं की मेंदुतून.
नशिबावर तुमचा विश्वास असेल तर म्हणतात की, नशिबामुळे तुमच्यासोबत एखादा सुंदर योगायोग घडतो, आणि क्षणार्धात तुम्हाला कोणीतरी आवडू लागतं. आणि त्यालाच सगळे मग पहिलं प्रेम म्हणतात. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम, हेच बहुदा पहिला प्रेम असतं. हे काही ढोबळ मानाने आणि कुणीही सांगितलं तरी पटतं, आणि त्याला जर संशोधनाची जोड मिळाली तर मग ते शंभर टक्के पटतं. कोणाला तरी पाहता आणि तुमच्या मेंदूत एकाच वेळी रिअॅक्शन तयार होतात, आणि माणूस प्रेमात पडतो.
तुमचं ह्रदय कितीही धडधडू देत, खरं प्रेम ह्रदयातून नव्हे तर ते मेंदूतून आलेलं असतं…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -