Saturday, February 8, 2025
Homeतंत्रज्ञानआयफोन निर्माता फॉक्सकॉन भारतात बनवणार चिप्स

आयफोन निर्माता फॉक्सकॉन भारतात बनवणार चिप्स

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तैवानमधील सर्वात मोठी आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनने भारतातील वेदांता कंपनीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. जागतिक चिप टंचाई दरम्यान या भागीदारी अंतर्गत दोन्ही कंपन्या या चिपचे उत्पादन भारतात करणार आहेत. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे, जी अॅपलचीही मोठी पुरवठादार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे.

900 कोटींची गुंतवणूक
फॉक्सकॉनने एका निवेदनात म्हटले की, त्यांनी वेदांत समूहासोबत भारतात चिप तयार करण्यासाठी करार केला आहे. कंपनीने भारतात इलेक्ट्रॉनिक्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फॉक्सकॉन या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यासाठी 118.7 दशलक्ष पाऊंड्स किंवा सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या भागीदारी अंतर्गत फॉक्सकॉनची 40 टक्के भागीदारी असेल.

जिओसोबत भागीदारी
कंपनीने म्हटले आहे की, दोन कंपन्यांमधील अशा प्रकारचा हा पहिलाच संयुक्त उपक्रम आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी इकोसिस्टम तयार करण्याचे स्वप्न साकार करेल. यापूर्वी फॉक्सकॉनने जागतिक स्तरावर चिप्स तयार करण्यासाठी जिओसोबत भागीदारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -