Sunday, December 22, 2024
Homeनोकरी10वी, 12वी टर्म 1 परीक्षांचे निकाल आज जाहीर होणार? बोर्डाने दिली ही...

10वी, 12वी टर्म 1 परीक्षांचे निकाल आज जाहीर होणार? बोर्डाने दिली ही माहिती

ताजी बातमी ऑनलाइन टीम

10th, 12th Term 1 Result 2021 Latest News: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) 10वी, 12वी टर्म-1 परीक्षाचे निकाल (10th 12th Term 1 Result 2021) आज 16 फेब्रुवारी रोजी जाहीर करणार नाही. बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने careers360.com ला सांगितले होते (CBSE Term 1 Result Update) की 10वी, 12वी टर्म 1 परीक्षेचे निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता (CBSE Term 1 Result News) आहे. त्याची खात्री झाल्यावर बोर्ड निकालाची तारीख जाहीर करेल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकालाच्या अपडेट्ससाठी (CBSE Exam Result Update) अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरच विसंबून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे”.

निकाल जाहीर झाल्यानंतर 10वी आणि 12वीची स्कोअर कार्डे अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in, cbseresults.nic.in वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. बोर्डाच्या वेबसाइट्सव्यतिरिक्त 10वी, 12वीचे निकाल तपासण्याच्या इतर अधिकृत मार्गांमध्ये डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट- digilocker.gov.in यांचा समावेश आहे. CBSE टर्म 2 परीक्षेच्या दृष्टीने बोर्डाने अलीकडेच डेटशीट अधिसूचना जारी केली आहे. CBSE टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाऊ शकतात.

असा तपासा CBSE टर्म 1 निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट द्यावी
याठिकाणी तुम्हाला CBSE 10वी टर्म 1 निकाल 2022 किंवा CBSE 12वी निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
येथे एक नवीन पृष्ठ उघडेल आणि आपल्याला आपला रोल नंबर, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख माहिती भरावी लागेल आणि सबमिट करावी लागेल.
आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -